Search

Saved articles

You have not yet added any article to your bookmarks!

Browse articles

GDPR Compliance

We use cookies to ensure you get the best experience on our website. By continuing to use our site, you accept our use of cookies, Privacy Policy, and Terms of Service.

“काँग्रेसने कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाला तुरुंगात टाकलं”, वर्ध्यातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi in Wardha Calls Congress Anti-Hindu : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० सप्टेंबर) वर्धा दौऱ्यावर आहेत. वर्ध्यात त्यांच्या हस्ते अनेक विकसकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान, यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने नेहमीच आमच्या आस्थेचा, श्रद्धेचा व संस्कृतीचा अपमान केला आहे, असा आरोप मोदी यांनी यावेळी केला. ते म्हणाले, “या काँग्रेसवाल्यांनी तर आपल्या गणपती बाप्पाला थेट तुरुंगात टाकलं होतं. काँग्रेसने नेहमीच अर्बन नक्षलवादाचं समर्थन केलं आहे. काँग्रेस हा बेईमान व भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुकडे-तुकडे गँगचे लोक व शहरी नक्षलवादी मिळून काँग्रेस पक्ष चालवत आहेत. कांग्रेस हा देशातील सर्वात अप्रामाणिक व भ्रष्ट पक्ष आहे. काँग्रेसचा शाही परिवार देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणून ओळखला जातो. काँग्रेसने आजवर आपली संस्कृती आपल्या आस्थेचा कधीच सन्मान केला नाही. त्यांनी जर आपल्या संस्कृतीचा, आस्थेचा सन्मान केला असता तर त्यांनी गणेशोत्सवाचा, गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध केला नसता. हे लोक गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध करतात.

मला गणेशाची पूजा करताना पाहून काँग्रेसचं तुष्टीकरणाचं भूत जागं झालं : मोदी

पंतप्रधान म्हणाले, गणेशोत्सव हा भारताच्या एकात्मतेचा उत्सव आहे आणि महाराष्ट्राची भूमी त्याची साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या लढाईच्या काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. प्रत्येक समाजाला, वर्गाला एकत्र आणलं. काँग्रेसने मात्र या गणेशोत्सवाचा तिरस्कार केला आहे. अलीकडेच मी गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ते पाहून काँग्रेसचा जळफळाट झाला. त्यांचं तुष्टीकरणाचं भूत जागं झालं. त्यांनी गणेश पूजनाच्या कार्यक्रमाचा विरोध केला. एका वर्गाचं, समाजाचं तुष्टीकरण करण्यासाठी काँग्रेस काहीही करू शकते.

Be the first to write a comment.